महिलांनी अन्याय,अत्याचार याबाबत व्यक्त होणे आवश्यक आहे – अभिनेत्री अश्विनी महांगडे
तुळजापूर – दि 6 प्रतिनिधी
महिलांनी आपल्यावर होणारे अन्याय, आणि अत्याचार याच्या विरोधात लढण्यासाठी आई भवानी या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शक्ती देत आहे सर्व महिलांनी सक्षम होण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लोकप्रिय मराठी अभिनेत्री स्वराज्य रक्षक संभाजी राजे या मालिकेतील राणू अक्का फेम अश्विनी महांगडे यांनी महिला भगिनींना केले आहे.
स्वराज्य रक्षक संभाजीराजे या ऐतिहासिक मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलीची म्हणजे राणूअक्का यांची भूमिका साकारणाऱ्या रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची तेजस्वी दर्शन घेतल्यानंतर मिळणारी ऊर्जा ही अद्वितीय आहे माझ्या करिअरमध्ये भवानी मातेचे स्थान अनन्यसाधारण आहे असेही याप्रसंगी मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी सांगितले. मंदिर कार्यालयात त्यांचा तुळजापूरकरांच्या वतीने तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे राज्य कार्याध्यक्ष निलेश बाबा जगदाळे, राज्य संघटक ज्ञानेश्वर काळे, सज्जना दूटाळ,रुचिका खामकर,प्रशांत कांबळे, श्रीकांत देशमुख,राहुल गव्हाणे,तुळजापूर तालुका संघटक विशाल केदार,गणेश तानवडे,आकाश लांडगे,प्रतीक भोसले,रोहीत लोमटे पुजारी संकेत पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी स्वराज्य संघटनेचे महेश गवळी,जिवनराजे इंगळे,प्रा.शिवदर्शन उकरंडे,प्रा.साचीन भालेकर, गोविंद खुरुद,सचिन ताकमोघे,ज्ञानेश्वर गवळी, शुभम कदम,अनिल आगलावे यांनी आई भवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला.