गुणवंत विद्यार्थ्यात तुळजापूर येथील सृष्टी महामुनी हिचा समावेश
लातूर दिनांक 26 प्रतिनिधी
लातूर पॅटर्न संपूर्ण देशभरात डॉक्टर व इंजिनिअर निर्माण करणारी शिक्षण पंढरी म्हणून ओळखला जातो. अशा या लातूर पॅटर्नचा नाव लौकिक वाढवणारी विद्यानंद CET अकॅडमी यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवून निकालाचा इतिहास निर्माण केला आहे. त्यामुळे सर्व पालकांनी याच अॅकॅडमीला प्रथम पसंती दिली आहे.
इंजिनिअरींग, फार्मसी, अॅग्री प्रवेश घेण्याच्या विद्यार्थ्यांना करिअरचा यशवंत देणारी विद्यानंद CET अकॅडमीच, MHT-CET च्या निकालाचा खरा लातूर पॅटर्न आहे. असे स्पष्ट प्रतिपादन सुप्रसिध्द न्यूरोसर्जन डॉ. हनुमंत किणीकर यांनी केले. मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यानंद CET अॅकॅडमी, लातूर द्वारा आयोजित गौरव गुणवंतांचा या सत्कार सोहळ्यात डॉ. हनुमंत किणीकर, प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी नगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस अधिकारी दयानंद पाटील होते तर मंचावर प्रमुख अतिथी डॉ. गणेश बेळंबे अकॅडमीचे संचालक प्रा. आनंद सरवदे उपस्थित होते. या प्रसंगी श्री. दयानंद पाटील व डॉ. गणेश बेळंबे यांनी करियर मंत्र या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
MHT-CET – 2023 चा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात लातूर पॅटर्न मधील एकमेव स्वतंत्र विद्यानंद CET अकॅडमी, लातूर चा रेकॉर्ड ब्रेक निकाल जाहीर झाला. PCM ग्रुपमधून अथर्व भोकरे 99.66% परसेंटाईल घेवून प्रथम आला तसेच PCB ग्रुपमधून आबा साळुंके याने 98.09%, तर सृष्टी सतीश महामूनी या विद्यार्थीनीने 97.56%, समर्थ रोजूळ 96%, धनश्री बाबर हिने 97.43%, सगर भगीरथ 96.16%, साक्षी रेड्डी 94%, करण गाटे 94%, रिया बेळगावे 94.20%, संजीवनी थावरे 94%, दिपक ठोंबरे 93.30%, हर्षदा काळे 90%, स्नेहल बारगले 97.20%, अॅकॅडमी सर्वोच्च निकाल ठरला आहे. यावर्षी अकॅडमीत 360 विद्यार्थी MHT-CET अभ्यासक्रम शिकत होते. त्यापैकी 240 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा अधिक परसेंटाईल इतके गुण मिळाले.
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अॅकॅडमीचे संचालक प्रा. आनंद सरवदे यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे. तर प्रा. साळुंके सर, प्रा. स्वामी सर, प्रा. माकणे सर, प्रा. मिटकरी मॅडम, प्रा. देशमाने मॅडम, प्रा. जाधवर सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले. या कार्यक्रमासाठी प्रिती पाचंगे मॅडम, कासले मॅडम, मेकले सर, अनिकेत सोनवणे, आशिष कांबळे यानी परिश्रम घेतले.