शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे – मारुती बनसोडे
शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन व शेतीपूरक व्यवसाय करून कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे असे मत परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव मारुती बनसोडे यांनी व्यक्त केले आज खानापूर येथील विविध बचत गटाच्या महिला व शेतकरी यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते .
परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग च्या वतीने सध्या तुळजापूर तालुक्यांतील पंधरा गावात ते महिला व शेतकरी यांच्यासाठी उद्योजकता प्रशिक्षण शिबीर घेत आहेत त्यात आज
खानापूर येथे महिला शेतकरी यांच्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला याला आज चांगला प्रतिसाद होता गावातील महिला, शेतकरी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग PMEGP, CMEGP, कृषी विभागाच्या अनेक योजनांची माहिती दिली गावातील काही महिला छोटे छोटे व्यवसाय करीत असून या प्रशिक्षणानंतर आणखीन उद्योग वाढण्याची शक्यता आहे तसे अनेक महिलांनी व्यवसाय करणार असल्याचे सांगीतले आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीआरपी जयश्री खोकडे व रोजगार सेवक श्री पटेल यांनी प्रयत्न केले