तुळजापूर दिनांक 19 प्रतिनिधी
नवोदय विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
जवाहर नवोदय विद्यालय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ,महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी आठ वाजता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात /आली .सर्वप्रथम विद्यालयाचे
प्राचार्य श्री गंगाराम सिंह व विद्यार्थी यांचे द्वारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन करण्यात आले .यावेळी व्यासपीठावरती वरिष्ठ अध्यापक श्री एस. एच. गायकवाड ,एच. जी. जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी ,शिक्षक वृंद उपस्थित होता ,यावेळी विद्यालयातील संगीत अध्यापक पी. एन. जोशी व विद्यार्थ्यांनी भवानी गीत व पोवाडा गाऊन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वीरश्री निर्माण केली .
याप्रसंगीत कुमारी स्नेहा कवडे, अक्षय पवार, प्रध्नुण कवडे या विद्यार्थिनी शिवाजी यांच्या कार्यांच्या वरती आपले विचार व्यक्त केले. प्राचार्य श्री गंगाराम सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माचे रक्षण कसे केले हे सांगून शिवाजी महाराजांच्या मनात महिलांच्या विषयी मनात कसा आदर होता. हे सांगून प्रत्येकाने शिवाजी महाराजांचा विचार आचरणात आणण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले .या कार्यक्रमाचे संचालन श्री एच.जी. जाधव यांनी केले.