तुळजापुरात राज्यस्तरीय महिला आरोग्य हक्क परिषद

3 ते 5 फेब्रुवारी महिलांच्या प्रश्नांची चर्चा

तुळजापूर दि 27 पुढारी वृत्तसेवा

आठवी महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषद तुळजापूर येथील टाटा सामाजिक संस्थेच्या परिसरात 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी या काळात होत आहे राज्यभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला या हक्क परिषदेमध्ये महिलांच्या प्रश्नावर चर्चा करणार असून याचे उद्घाटन लखनऊच्या राष्ट्रीय समिती सदस्य अरुंधती धुरू यांच्या शुभहस्ते होत आहे अशी माहिती पत्रकार परिषदे मध्ये हॅलो फाउंडेशनच्या समन्वयक सौ वासंती मुळे यांनी दिली.

लोकप्रबोधन संस्था आरळी बुद्रुक ता. तुळजापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हॅलो फाउंडेशन समन्वयक वासंती मुळे, स्वयं शिक्षण प्रयोग प्रमुख नसीम शेख व गोदावरी शिरसागर लोकप्रबोधन संस्थेच्या अनुराधा धोतरकर व अश्विनी व्हरकट, लोकप्रबोधन संस्थेचे अध्यक्ष धनाजी धोतरकर यांची याप्रसंगी उपस्थिती होती

3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी या काळात तुळजापूर येथील टाटा सामाजिक संस्था येथे ही हक्क परिषद संपन्न होत असून दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य हक्क परिषदेच्या कार्यक्रमात व्यापक महिलांच्या आरोग्य हक्का विषयी चर्चा झाली या सर्व विषयांची मांडणी महाराष्ट्रातील गावागावात होण्याच्या अनुषंगाने कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थिती नंतर होणारी ही पहिली राज्यस्तरीय हक्क परिषद पुढे या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहे राज्यभरातून आलेल्या महिला प्रतिनिधी आपल्या झालेल्या अभ्यासाच्या अनुभवातून या परिषदेमध्ये आपल्या विषयाची मांडणी करणार आहेत

यापूर्वी पहिली महिला आरोग्य परिषद 2006 मध्ये मुंबई , 2008 मध्ये पुणे 2010 मध्ये नागपूर 2012 मध्ये शहादा 2014 मध्ये बीड 2016 मध्ये चिपळूण 2018 मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या असून 2023 ची परिषद तुळजापूर येथे संपन्न होत आहे राज्यभरातील 300 महिला प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हॅलो समन्वयक वासंती मुळे यांनी दिली. शासनाचे कोणतेही अनुदान न घेता या परिषद संपन्न होत असून लोकवर्गणीमधून याचा खर्च आम्ही करत आहोत असे यावेळी संयोजकांनी सांगितले.

Reply allReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!