यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे रा. से.यो.शिबिराचे उदघाट्न
तुळजापूर दि 19 प्रतिनिधी. ग्रामीण भागातील मुला मुलींनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यावा आई-वडिलांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे कारण शिक्षण केवळ नोकरीसाठी नसून व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि उद्योग व्यवसाय व्यवहार याच्या सक्षमीकरणासाठी त्याचा उपयोग होतो असे उद्गार यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल शित्रे यांनी तुळजापूर तालुक्यातील होनाळा येथे काढले.
येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना शिबिर मौजे होनाळा येथे सुरु झाले.
या शिबिराचे उदघाट्न दिनांक 17/1/2023 रोजी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्र) तुळजाभवानी मंदि संस्थान, तुळजापूर मा. सौ. योगिता कोल्हे मॅडम यांच्या हस्ते झाले.आई तुळजाभवानी, संत गाडगेबाबा, यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमाचे पूजन करून करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. अनिल शित्रे हे होते. प्रतिष्ठित नागरिक शाहूराज कदम,जयंतराव टोम्पे ,भुजंगराव महंक राज युवराज सपकाळ रमेशराव कोरे यांची प्रमुख उपस्थिती. तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शशिकला भालकरे,प्रा.डॉ.अशोक कदम,प्रा.डॉ.अंबादास बिराजदार,प्रा.डॉ.अशोक मर्डे,प्रा.डॉ. विलास राठोड, प्रा.डॉ.शिवाजी जेटीथोर, हणमंत भुजबळ, जयंत टोपें,यांची उपस्थिती होती.
शिबिर उदघाट्न प्रसंगी बोलताना सौ.योगिता कोल्हे मॅडम यांनी महाविद्यालयीन विध्यार्थ्या मधे श्रम प्रतिष्ठा, सामाजिक समानता आणि राष्ट्रीय एकत्मा या मूल्यांचे संवर्धन होते. या राष्ट्रीय सामाजिक शैक्षणिक विध्यार्थी व ग्रामस्थ यांनी जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा.
अध्यक्षीय समारोप करताना प्र. प्राचार्य डॉक्टर अनिल शित्रे यांनी ग्रामीण भागातील मुला मुलींनी शिकले पाहिजे शिक्षणामुळे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो शिक्षण केवळ नोकरीसाठी घेतले जाते हे चुकीचे आहे शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्वाचा होणारा विकास हा अत्यंत मोलाचा आहे शिक्षण घेतल्यानंतर शेती देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने करता येते,आपल्याच कुटुंबाच्या विकासासाठी हेच शिक्षण उपयोगी पडते असे सांगून अनेक उदाहरणासह प्राचार्य डॉक्टर अनिल शित्रे यांनी शिक्षणाचा मुद्दा अधोरेखित केला . पारंपरिक शेती नुकसानीत जात असताना उच्च शिक्षित तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रात प्रगती करावी प्रत्येक कुटुंबाचा झालेला विकास हा त्या गावाच्या विकासाचा पाया होणार आहे आणि गावाचा विकास हा जिल्हा आणि राज्याचा विकासाचा प्रमुख मुद्दा होऊ शकतो अशी व्यापक विकासाची संकल्पना यावेळी प्राचार्य शित्रे यांनी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसमोर मांडली.
विद्यापीठाने यावर्षी युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास हे राष्ट्रीय सेवा योजनेचे घोषवाक्य प्रसारित केले आहे हे घोषवाक्य वास्तवात खरे होण्यासाठी पालक,विद्यार्थी यांनी शिक्षण घेण्यासाठी कोणताही दुसरा पर्याय ठेवू नये शिक्षणाला प्राधान्य द्यावे असे आवाहन केले. सात दिवस चालणारे या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी गावाच्या विकासामध्ये हातभार लावावा गावाच्या समस्या जाणून घ्याव्यात व गावकऱ्यांनी देखील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावे असे सुचवले,या वेळी सर्व स्वयं सेवक विध्यार्थी -विध्यार्थीनी, प्राध्यापक, गावाकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानपरिषद निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्यामुळे या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित राहू शकले नाहीत.