तुळजापुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी साजरी
तुळजापूर दिनांक 27 प्रतिनिधी
तुळजापूर येथील सावरकर चौक येथे स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांची 98 वी पुण्यतिथी सावरकर विचार मंच च्या वतीने उत्साहात संपन्न झाली. या प्रसंगी मोठ्या संख्येने सावरकर प्रेमी उपस्थित होते.
तुळजापूर येथील बस स्थानकासमोर असणाऱ्या सावरकर चौक येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली याप्रसंगी प्रतिमेचे पूजन सावरकर प्रेमी निलेश रोचकरी यांनी केले. सनातन संस्थेचे दीपक पलंगे यांनी याप्रसंगी सावरकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि युवकांना मार्गदर्शन केले. हिंदू गर्जना चळवळीचे प्रमुख एडवोकेट गिरीश लोहारेकर यांनी याप्रसंगी सावरकरांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले व सावरकरांना अभिवादन केले यानिमित्ताने अध्यक्ष बाळासाहेब शामराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपाचे नेते उमेश गवते, शिवसेनेचे नेते श्याम पवार, पंकज पाटील, महेश गरड, महेश कुलकर्णी, शिवाजी बोधले, एडवोकेट ओंकार मस्के, विश्वास पाठक, एडवोकेट जनक पाटील, शहाजी जगदाळे, राहुल कुलकर्णी, भालचंद्र गोडसे, शिवाजी डावखरे पाटील, आप्पासाहेब रसाळ, उमेश कदम, पत्रकार अंबादास पोफळे, गिरीश देवळालकर यांची याप्रसंगी उपस्थिती होती. सर्वांनी सावरकरांच्या प्रतिमेवर पुष्पांजली अर्पण केली आणि अभिवादन केले.