तुळजापुरात काँग्रेसचे दिवंगत नेते हरिभाऊ शिंदे यांचे वारस लखन पेंदे यांनी सोडली काँग्रेस
तुळजापूर दि. 15 डॉ. सतीश महामुनी
जिजामाता नगर नगरपरिषद मतदारसंघातील काँग्रेसचे परंपरागत उमेदवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत हरिश्चंद्र पेंदे यांचे पुतणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष लखन पेंदे यांनी आश्चर्यकारक भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे शहरात त्यांच्या प्रवेशाने चर्चेला उधाण आले आहे.
प्रामाणिक आणि सचोटीने राजकारण करणारे दिवंगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ पेंदे यांचा वारसा चालवण्यासाठी काँग्रेस पक्षात युवक काँग्रेस पदावर काम करणारे काँग्रेस पक्षावर अनेक वर्ष निष्ठा ठेवून किसान चौकी जिजामाता नगर या भागात काँग्रेसचे जुने घर म्हणून प्रसिद्ध असणारे लखन पेंदे कोणत्या कारणांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात गेले याविषयी उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
नगरपरिषदेच्या राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाकडे जी मोजकी मोठी कुटुंब निष्ठावान म्हणून मानली जातात त्यांच्यातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ पेंदे यांचे वारस लखन पेदे यांच्या या प्रवेशाने काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणी तुळजापूर नगरपरिषद आणि उस्मानाबाद जनता सहकारी बँक अशा वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या दिवंगत काँग्रेस नेते हरिभाऊ पेंदे यांचा वारसा चालवण्यासाठी सतत पक्षांमध्ये सक्रिय असणारे आणि जिजामाता नगर या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे निवडणुकीतील उमेदवार ज्यांनी प्रस्थापित विनोद गंगणे यांच्या विरोधात सतत निवडणुका लढवून पराभूत झाले परंतु पक्षावर ज्यांनी आपली श्रद्धा आणि निष्ठा कमी होऊ दिली नाही असे निष्ठावान लखन पेंदे अचानकपणे काँग्रेस सोडून गेल्यामुळे राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.
त्यांच्या राजकीय प्रवाशानंतर त्यांच्याशी संपर्क साधला आणि प्रतिक्रिया विचारले असता त्यांनी सांगितले की आपण कायम निष्ठावान म्हणून काम केले आहे परंतु आज माझ्यावर भारतीय जनता पार्टी प्रवेश करण्याची वेळ आलेली आहे या संदर्भात जास्तीचे मी बोलणार नाही परंतु मी प्रवेश का केला असेल याची आत्मचिंतन संबंधित आणि करावे अशा एका वाक्यात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आगामी काळात होणाऱ्या तुळजापूर शहराच्या नगरपरिषदेच्या निवडणुका आणि शहराच्या राजकारणाचे वेगवेगळे पैलू लक्षात घेता यापूर्वी काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेले शांताराम पेंदे आणि त्यांच्या पाठोपाठ लखन पेंदे यांचा प्रवेश बरेच काही सांगून जातो शांताराम पेंदे यांना शहराध्यक्ष पद बहाल करण्यात आले. आगामी काळात लखन पेंदे यांच्यावर कोणती जबाबदारी येणार का याकडे देखील लक्ष द्यावे लागेल.