राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक युवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
तुळजापूर दि 5 डॉ. सतीश महामुनी
आमदार मा.श्री.राणाजगजीतसिंह पाटील साहेब यांच्या उपस्थितीत, युवा नेते विनोद पिटुभैय्या गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली आप्पासाहेब पवार, सचिन भैय्या कदम ,महेश पवार गोपाळ पवार, सुदर्शन पवार, अजिंक्य नवले, परिक्षित साळुंखे, सौरभ पवार, करण देशमुख, सुनील इंगळे, आकाश पवार, गणेश पवार, नागेश पवार ,सूर्या कदम, रवी पवार, अण्णा इंगळे ,दादा इंगळे, विलास मोठे, महेश महाराज पवार, अक्षय पवार ,अभिषेक पवार ,योगेश माळी, अजित पवार, किशन इंगळे, सोमनाथ पवार, श्याम इंगळे, आप्पा गायकवाड ,रमेश घाडगे , सुमित पारवे, ओंकार पवार, भागवत बेरड, बापू पवार , अविनाश पवार, सागर इंगळे, कृष्णा इंगळे, किरण गवते, सुरज रसाळ, शुभम रसाळ, त्यांनी सनी रसाळ, बिटु रसाळ, या युवकांचा आराधवाडी येथे जाहीर प्रवेश करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष शांताराम नाना पेंदे, नरेश काका अमृतराव ,औदुंबर दादा कदम, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद दादा कंदले, युवा मोर्चा शहराध्यक्ष राजेश्वर कदम , मा जीव नगरसेवक अभिजीत कदम, संतोष पवार, सुहास काका साळुंके व आराधवाडी येथील नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख राज्यस्तरीय शरद संवाद यात्रा तुळजापुरात आली होती आणि तेथे त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भारतीय जनता पार्टीच्या भूलथापांना आणि आमिषांना बळी न पडता कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या विचारावर ठाम राहावे असे आवाहन केले होते 48 तास उलटण्यापूर्वीच तुळजापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तरुण भारतीय जनता पार्टी डेरे दाखल झालेले आहेत त्यामुळे युवक राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी केलेले आवाहन तुळजापुरात धुडकावून लावण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे युवक नेते विनोद गंगणे यांच्यावर विश्वास ठेवू आणि आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या कार्यपद्धती चा स्वीकार करीत या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केलेला आहे आराधवाडी आणि कमान वेस या भागातील हे तरुणा असून स्थानिक राजकारणामध्ये ज्या ज्या घटकांची महत्त्वाची भूमिका असते अशा घटकाशी निगडित ही तरुण मंडळी आहे. या सर्व कार्यकर्त्यांना आमदार राणा जगदीश पाटील यांच्या हस्ते कमळाचे चिन्ह असलेले उपरणे देऊन पक्षांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे यातील काही कार्यकर्ते आमदारांना जगजीत सिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील निकटवर्तीय आहेत.