गंगणे समर्थकांकडून दिवसभर सामाजिक उपक्रमांची रेलचेल
तुळजापूर दिनांक 28 प्रतिनिधी
तुळजापूर नगरपालिकेचे सूत्रधार भारतीय जनता पार्टीचे नेते माजी नगरसेवक विनोद गंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3तुळजापूर (खुर्द) शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य स्मार्ट टीव्ही, गुणवंत विद्यार्थी सत्कार व खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
तुळजापूर शहरातील अग्रणी समाजसेवक भारतीय जनता पार्टीचे नेते श्री.विनोद गंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द)शाळेस तुळजाई नागरी सहकारी पतसंस्था तुळजापूर(खुर्द) कर्मचाऱ्यांच्या वतीने तुळजाई पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री.संजय ढवळे व सह व्यवस्थापक श्री.हनुमंत माळी यांनी माजी नगरसेवक विनोद गंगणे यांच्या शुभहस्ते नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द)चे मुख्याध्यापक श्री. तुकाराम मोटे यांचेकडे 55″ BPL स्मार्ट टीव्ही शाळेस भेट देण्यात आला.
तुळजापूर शहरात गोरगरिबांना कोरोना काळात मदत केल्याबद्दल ,दिवाळीत गोरगरिबांना आनंदाचा शिधावाटप केल्याबद्दल, 125 नागरिकांना 10 लाखाचा विमा काढल्याबद्दल व 2500 मुलींना दिवाळी मनपसंद ड्रेस खरेदी करून दिल्याबद्दल सन्मान कर्तृत्वाचा हे सन्मानचिन्ह देऊन . गंगणे यांचा तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने बहुमान प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी ऑस्ट्रेलिया मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाल्याबद्दल शाळेचा विद्यार्थी श्री.राहुल उल्हास देशमाने यांचा विशेष सत्कार करण्यात आला 2023 मध्ये यशस्वी झालेल्या इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथी मधील 23 विद्यार्थ्यांचा तसेच चि.अनुज कल्याण गंगावणे या विद्यार्थ्यांचा भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल अनुज सह , सर्व पालकांचा,सर्व विद्यार्थ्यांचा पॅड,पेन,पुष्पगुच्छ,शाल देऊन सत्कार करण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला
या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष मा.सचिन रोचकरी,. विजय कंदले पंडितराव जगदाळे, सौ.मंजुषाताई देशमाने औदुंबर कदम, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. लक्ष्मीबाई रणजित भोजने,भाजपा शहराध्यक्ष श्री. शांताराम पेंदे ,श्री.गुड्डू कदम, श्री.चोपदार ,तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री.राजाभाऊ देशमाने, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर समन्वय समितीचे अध्यक्ष श्री. आनंद कंदले या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.तुकाराम मोटे, सह शिक्षक श्री.अशोक शेंडगे,श्री.सतीश यादव श्री.जालिंदर राऊत,श्री.विश्वजीत निडवंचे,श्री.रविकुमार पवार श्रीमती प्रणिता मोरे श्रीमती ताटे कुमारी हुंडेकरी यांनी तसेच सेवक श्री संदीप माने श्री.संजित देडे,श्रीम. शोभा कांबळे, श्रीम.कल्पना व्हटकर यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री.अशोक शेंडगे यांनी केले.तर आभार मुख्याध्यापक श्री. तुकाराम मोटे यांनी व्यक्त केले .