तुळजापूर दिनांक 4 डॉ सतीश महामुनी
तुळजापूर तालुक्याचे राजकारणामध्ये मागील दहा वर्षापासून नगरपरिषदेच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात धबधबा निर्माण केलेले युवक नेते विनोद गंगणे यांनी नगर परिषदेच्या राजकारणामध्ये आपल्या वर्चस्व कायम ठेवले असल्याचे चित्र आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांनी जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा केला रविवारी पाच मार्च 2023 रोजी सकाळी दहा वाजता मोफत नेत्र तपासणी व चष्मा वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तुळजापूर तालुक्याचे राजकारणामध्ये मागील दहा वर्षापासून नगरपरिषदेच्या माध्यमातून सत्तेवर असलेले सत्ताधारी पालिकेचे सूत्रधार विनोद गंगणे आपला राजकीय वर्चस्व कायम ठेवून कार्यरत आहेत. सर्व पक्षाबरोबर असलेले त्यांचे हितसंबंध यामुळे तुळजापुरात त्यांच्या विरोधकांना विरोधाची धार सापडली नाही त्यामुळे विनोद गंगणे यांचा पालिकेच्या राजकारणावरील पकड पूर्वीप्रमाणे घट्ट आहे.
नगरपरिषदेचे राजकारणामध्ये यापूर्वी शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये चांगला विरोध होता, शेतकरी कामगार पक्षामध्ये माणिकराव खपले यांच्या मार्गदर्शनाखाली अन नेतृत्वाखाली नगरपरिषदेचा पन्नास वर्षे कारभार चालला या कारभाराला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बॅनरखाली देवानंद रोजकरी यांनी खिंडार पाडले आणि माणिकराव दादांचा झेंडा नगरपालिकेवर उतरला गेला त्यानंतर देवानंद रोचकरी यांनी एक टर्म नगरपालिकेचा प्रभावित कारभार केला परंतु विनोद गंगणे यांची आजची नगरपालिकेची टीम त्यांच्यापासून दूर गेली आणि रो च करी यांचे नगरपालिकेवरील साम्राज्य संपुष्टात आले. त्यापूर्वी देवानंद रोचकरी व सुरेश आप्पा पाटील या दोघांनी नगरपालिकेचा कारभार केला. या काळात नगर परिषदेचा कारभार व्यक्ति केंद्र चालला त्याचा उपयोग शहराला होऊ शकला नाही.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विनोद गंगणे यांनी नगरपरिषदेच्या सत्तेच्या राजकारणात पुन्हा बाजी मारली आणि दुसऱ्यांदा नगरपालिका ताब्यात ठेवण्यात त्यांना यश मिळाले. जुने आणि नवे यांचा मेळ घालत शहराच्या नात्यागोत्याच्या राजकारणात तसेच बेरजेच्या राजकारणात विनोद गंगणे यांनी सलग दुसऱ्यांदा यश मिळवले आणि पाच वर्ष नगर परिषदेच्या कारभारावर आपले वर्चस्व कायम ठेवले पक्ष कोणताही असला तरी सत्ता आपलीच राहणार या धोरणानुसार विनोद गंगणे यांनी तुळजापूर नगर परिषदेच्या राजकारणामध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये त्यांना विरोध करण्यासाठी बोटावर मोजण्या एवढे सदस्य असून विरोधकांनी विकासाच्या राजकारणात सांभाळून घेण्याचे सकारात्मक राजकारण त्यांच्या राजकारणामध्ये त्यांना सतत सत्तेमध्ये ठेवण्यात यशस्वी झाले आहे.
तुळजापूर शहरात कोणताही नवीन प्रकल्प न करता आहे त्या स्थितीमध्ये कारभार करत हे नगरपालिका चालवली जाते येथे येणाऱ्या भाविक भक्तांना चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेकडून कोणताही मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला नाही किंवा राज्य सरकारकडे तसा कुठलाही प्रस्ताव देखील दिला गेला नाही केवळ सत्ता सांभाळण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करीत आपल्या वर्चस्व कायम ठेवण्यात सत्ताधारी मंडळीला सतत यश मिळत आले आहे त्यांच्या कामांमध्ये शहरवासीय देखील फारसं रस घेत नाहीत किंवा कुठलीही प्रतिक्रिया देखील दिली जात नाही अशी स्थिती आहे.
येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन विनोद गंगणे यांनी आपले पत्ते अद्याप खुले केलेले नाहीत त्यामध्ये निवडणुका पुढे ढकलल्यामुळे आजच्या स्थितीला कोणतीही ओपन पॉलिटिक्स कृती झालेली नाही त्यासंदर्भातील राजकीय शहकाचे आज पडद्यामागे आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते राणा जगजितसिंह पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्याच नेतृत्वाखाली विनोद गंगणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये आपला सक्रिय वावर ठेवला आहे भारतीय जनता पार्टीचे पक्ष कार्यालयामध्ये देखील ही सर्व मंडळी सक्रियपणे वावरतात नुकत्याच झालेल्या शिक्षक विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची परराष्ट्र केली यावरून आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकांमध्ये विनोद गंगणे हे कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील असा अंदाज आहे. या दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्यामध्ये त्यांना आज पर्यंत यश आलेले आहे निवडणुकीच्या निमित्ताने कोणती स्थिती राहील हीच परिस्थिती आचारसंहिता लागू झाल्यानंतर समजणार आहे जुन्या कार्यकर्त्यांना विनोद गंगणे यांनी नगरपालिकेच्या राजकारणामध्ये सत्तेचा आणि विकास कामांचा वाटा दिला जावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे यासंदर्भात दोन शिष्ट मंडळ आमदार राणाजी पाटील यांना देखील यापूर्वी भेटलेले आहेत.
विनोद गंगणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांनी शहराच्या सर्व प्रभागात वाढदिवस साजरा केला समर्थकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला जल्लोष आणि डिजिटल तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेले विविध कार्यक्रम यामध्ये मोठा उत्साह होता उत्स्फूर्तपणे कार्यकर्त्यांनी वाढदिवसामध्ये सहभाग नोंदवला विद्यमान माजी नगरसेवक आणि आगामी काळामध्ये इच्छुक असणारे कार्यकर्ते या सर्वांनी एकजुटीने वाढदिवसाला महत्त्व देऊन विविध कार्यक्रम साजरे केले त्यामुळे विनोद गंगणे हे आपली राजकीय ताकद कायम ठेवून पुढील राजकारणात सक्रिय आहेत हेच दिसून आले आहे आपली राजकीय ताकद टिकून ठेवण्यामध्ये त्यांनी आपले राजकीय कौशल्य दाखवून दिले आहे.
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाचे रुग्ण सेवा समितीचे सदस्य आनंद कंदले आणि माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्याकडून नगरपालिकेचे किंग मेकर विनोद गंगणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 5 मार्च 2023 रोजी सकाळी दहा वाजेपासून मोफत नेत्र तपासणी आणि चष्मा वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये गरजू आणि इच्छुक नागरिकांची तपासणी मोफत केली जाणार आहे यामध्ये डोळ्यावरील चष्म्यासाठी लागणारे उपचार आणि चष्मा याच कार्यक्रमांमध्ये वितरित केला जाणार आहे इच्छुकांनी तुळजाभवानी पुजारी मंडळात येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.