तुळजापुरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
तुळजापूर दि 21 प्रतिनिधी
तुळजापुरातील तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या प्रांगणात जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी योग दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला मोठ्या संख्येने शहरातील प्रतिष्ठित नागरिक शासकीय अधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . मागील 10 वर्षापासून जागतिक योग दिनाच्या निमित्ताने होणारा हा कार्यक्रम अखंडितपणे सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त तुळजापूर येथे तुळजाभवानी सैनिक शाळेच्या मैदानात योग शिबीराचे आयोजन करण्यात आले या योग शिबीरात तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील,जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक, जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे, भाजप महिला जिल्हा उपाध्यक्ष मीनाताई सोमाजी , तालुका सरचिटणीस शिवाजी बोधले, भाजपचे नेते बाबासाहेब घोंगते, विधी व न्याय संघटना प्रमुख गिरीश कुलकर्णी व शहरातील मुख्य प्रतिष्ठीत नागरिक, सैनिक शाळेचे शिक्षक,विद्यार्थी विद्यार्थीनी व कर्मचारी यांनीही सहभागी होऊन योग साधना केली. शहरातील विविध प्रशालेचे विद्यार्थी शिक्षक आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते जागतिक योग दिनाच्या या कार्यक्रमाला मागील 10 वर्षापासून शहरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद असतो या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये भाजपचे नेते गुलचंद व्यवहारे आणि त्यांच्या सहकारी यांचा सहभाग होता
सहभागी योगा शिक्षक आर्ट औफ लिव्हींगचे प्रशिक्षक राजेश देशमुख, भुमकर,व मैंदरगै यांचा भारतीय जनता पार्टी च्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे, जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक, भाजपाचे नेते उद्योजक बाबासाहेब घोंगते, तालुका सरचिटणीस शिवाजी बोधले, भाजपचे नेते बाबासाहेब घोंगते प्रा. रामलिंग थोरात, प्रा. अशोक कदम व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. मुकुंद गायकवाड सैनिक शाळेचे प्राचार्य वैजनाथ घोडके, देविदास पांचाळ व सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती. सैनिकी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजकांच्या वतीने मोठे व्यासपीठ उभे करण्यात आले होते आणि योग साधकांना योग साधना करण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती सहभागी झालेल्या साधकांनी आयोजकांनी उत्तम व्यवस्था केल्याबद्दल आपला अभिप्राय नोंदवला.