मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारची योजना
तुळजापूर दिनांक 18 प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत कार्यक्रम ( सारथी) छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड एमकेसीएल यांच्या वतीने मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्स मोफत असून इच्छुकांनी श्री समर्थ कॉम्प्युटर जनता बँकेच्या पाठीमागे तुळजापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन संचालक कु. अनुराधा नाईक यांनी केले आहे.
श्री समर्थ कॉम्प्युटर यांच्या वतीने प्रसारित केलेल्या एका पत्रकाद्वारे इच्छुक विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आलेले आहे राज्य सरकारचा अंगीकृत कार्यक्रमा असणाऱ्या सारथी आणि एमकेसीएल यांच्या संयुक्त विद्यमानाने 20000 रुपये फीस असणारा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्स या योजनेअंतर्गत मोफत शिकवला जाणार आहे या कोर्स साठी मर्यादित जागा असून प्रथम येणाऱ्या प्राधान्य दिले जाणार आहे. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत .ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र आणि टीसी, तहसील कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र , एक वर्ष किंवा तीन वर्षाचे उत्पन्नाचे, प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि आय कार्ड आकाराचे दोन फोटो अशा कागदपत्रासह श्री समर्थ कॉम्प्युटर जनता बँकेच्या पाठीमागे तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे संपर्क साधावा असे आवाहन सेंटर संचालक कु अनुराधा नाईक यांनी केलेले आहे.
श्री समर्थ कॉम्प्युटर हे तुळजापूर येथील अधिकृत असणाऱ्या एमकेसीएलच्या सेंटर्स मधील एक सेंटर असून येथे अनेक वर्षापासून संगणक अभ्यासक्रम शिकवले जातात एमकेसीएल चा एम एस सी आय टी हा अभ्यासक्रम येथे प्राधान्याने शिकवला जातो याच सेंटरमध्ये राज्य सरकारचा सारथी मधून चालविण्यात येणारा मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना लाभ देणारा हा कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्स मोफत शिकवला जाणारा असून इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सेंटर कडे संपर्क साधण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.