सरपंच परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा जिनत सय्यद यांना राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार प्रदान
तुळजापुर – रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार 2022 शिवजयंतीचे औचित्य साधत सरपंच परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा जिनत कोहिनूर सय्यद यांना प्रतिष्ठानच्या संस्थापिका प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,मानाची पैठणी साडी,सन्मानपत्र देत उस्मानाबाद येथे प्रदान करण्यात आला.
जिनत कोहिनूर सय्यद यांनी सरपंच परिषद पुणे महाराष्ट्रच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांच्या विविध प्रश्नांबाबत सतत आवाज उठवत राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केलाआहे. सामाजिक,आरोग्य,शैक्षणिक उपक्रम असो वा गाव विकासात नवनवीन संकल्पना राबवत मार्गदर्शन करत असतात, जिनत सय्यद यांना यापूर्वी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नवदुर्गा पुरस्कार सोहळा वितरण प्रसंगी सरपंच परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब जेवे,जिल्हा संघटक बालाजी कुटे,जयसिंग बोराडे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अतिक शेख,युवा नेते रोहित पडवळ, प्रतिष्ठानचे जिल्हा प्रवक्ते राम जळकोटे, प्रतिक भोसले,प्रसाद राजमाने,विशाल केदार,अविनाश कुंभार,अर्थव राजे निंबाळकर,आयशा सय्यद, कोहनूर सय्यद आदींची उपस्थिती होती.
जिनत सय्यद यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र भोसले,राज्य कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ, राज्य सरचिटणीस प्रवीण रणबागुल,मराठवाडा अध्यक्ष सतिष सोंने, जिल्हाध्यक्ष सुजीत हंगरगेकर, जिल्हा उपाध्यक्ष किरण व्हरकट, तुळजापूर तालुका अध्यक्ष संजय गुंजोटे,सरपंच संजय आसलकर, राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल आगलावे आदींनी अभिनंदन केले आहे.