हिंदू गर्जना ढोल पथकाचा दहावा वर्धापन दिन साजरा, संस्थेने तुळजापूर चा नावलौकिक वाढवला

सर्व पक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत हिंदुगर्जना  पथकाचा 10 वा वर्धापन दिन साजरा 

तुळजापूर दि 7  डाॅ.सतीश महामुनी

तुळजापूरातील एकमेव असलेले ढोल ताशा पथक, हिंदुगर्जना ढोला ताशा पथकाच्या सरावाचा काल दहाव्या वर्धापन दिनी भव्य शुभारंभ झाला. हिंदू गर्जना पथकाने या निमित्ताने दहाव्या वर्षात पदार्पण केले आहे या निमित्ताने संस्थेचे प्रमुख एडवोकेट गिरीश लोहारकर यांनी सर्वांचे स्वागत केले.

याप्रसंगी हिंदुगर्जना पथकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला तुळजापूर शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते संस्थापक गिरीष लोहारेकर, आनंद  कंदले, विशाल रोचकरी, सचिन पाटील, अमोल कुतवळ, सचिन रोचकरी, पंडीत जगदाळे, दिनेश क्षीरसागर, सुहास राऊत आणि पंकज शहाणे यांची याप्रसंगी उपस्थिती होती

. ढोल ताशाची मोडीत निघालेली परंपरा तुळजापूरात पुन्हा रुजवून गेली दहा वर्षे अविरतपणे पथकाने शहरातील गणेशोत्सवाला वैभव प्राप्त करुन दिले आहे. विशेष म्हणजे मागील दोन दशकांपासून शहरातील मिरवणूकातून महिला व मुलींची असलेली अनुपस्थिती पथकाने त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीने भरुन काढल्या बद्दल सर्व नेते मंडीळींनी गावच्या वतीने पथकाचे कार्याचे कौतुक केले 

तुळजापूर शहरात एखादा संकल्प मांडून तो आपल्या जिद्दीने आणि चिकाटीने पुर्ण पथकाने करुन या संपूर्ण दहा वर्षांत कोणतेही गालबोट न लागू देता गुणवत्ता, शिस्त आणि उत्साह टिकवून ठेवले असून पथकाच्या पुढील वाटचालीस नेत्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.

तुळजापूर शहराच्या सांस्कृतिक परंपरेला साजेसे कार्य या दहा वर्षांमध्ये हिंदू गर्जना ढोल पथक यांच्या माध्यमातून करण्यात आली मिरवणुकीसाठी योग्य वातावरण निर्मिती आणि हिंदू संस्कृतीचा प्रसार प्रचार करण्याची काम त्यांच्या मिरवणुकाच्या कामामधून झाल्याचे सांगण्यात आले. या ढोल पथकाच्या कामामुळे तरुण पिढी आपल्या जुन्या वारशाला पुढे चालवत जाताना सर्वांना आनंद देत आहे हे या हिंदू गर्जना कामाचे वैशिष्ट्य असल्याचे या निमित्ताने उपस्थित वक्त्यांनी सांगितले.

याप्रसंगी पथकाने मनोगत व्यक्त करताना सर्व गणेश मंडळांना परंपरागत पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन संस्थापक गिरीश लोहारेकर यांनी सर्व गणेश भक्तांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!