तुळजापूर दि 4 डॉ. सतीश महामुनी
केंद्र सरकारने राज्य मंत्रिमंडळ आणि केंद्र सरकारकडे औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यासंदर्भात दिलेला प्रस्ताव मोदी सरकारने 3 फेब्रुवारी 2023 रोजी मंजूर केला आणि महाराष्ट्रात सर्वत्र छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या प्रदीर्घकाळ रेंगाळत पडलेल्या नामांतरावरून समाधान व्यक्त करण्यात आले
या दोन शहराचे नामांतरण व्हावे अशी प्रदीर्घकाळ शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन पक्षांची मागणी राहिली आहे अनेक हिंदुत्ववादी संघटना देखील संभाजीनगर आणि धाराशिव या नामांतरासाठी आग्रही होते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील 50 वर्षापासून काँग्रेस सत्तेवर असल्यामुळे 1988 पासून हा प्रश्न रेंगाळत पडलेला होता आणि सातत्याने या प्रश्नाला टोलवले जात होते अल्पसंख्यांकाचे लांबून चालन करण्याच्या उद्देशाने यापूर्वीच्या सर्व सरकारांनी नामांतराचा हा विषय बाजूला ठेवला आणि मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर करून मराठवाड्यातील जनतेला या प्रश्नापासून दूर नेले विद्यापीठाच्या नामांतर मराठवाड्यातील जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ते स्वीकारले आहे याचे सर्व स्तरातील स्वागत देखील झाले समतेचा संदेश देणारा हा विषय असल्यामुळे कोणीही या निर्णयाला विरोध केला नाही.
छत्रपती संभाजी नगर हे नामांतरण झाल्यानंतर तेथील स्थानिक अल्पसंख्यांक नेते विशेषता खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाविरोधात शनिवारी 4 मार्च 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाचा फोटो हातामध्ये धरून आंदोलन केले त्यामुळे सरकारच्या निर्णयाचा अनादर करणाऱ्या या शक्तीमुळे कोणतेही कारण नसताना वातावरण संतप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 13 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राज्य सरकारने एकदा निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय सर्वांना लागू करावाच लागणार आहे तरीही आपली मताची पोळी शाबूत राहण्यासाठी खासदार जलील नको त्या कुरापती काढून लोकांना भडकावण्याचे काम करत असताना दिसत आहेत याविषयीचे चित्र प्रसारमाध्यमांमधून सर्वत्र पसरल्यानंतर त्यांच्या त्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त होत आहे या अनुषंगाने छत्रपती संभाजी नगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी खासदार जलील यांना त्यांच्या कृतीनंतर उत्तर दिले आहे स्थानिक भाजप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देखील या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पहिल्याच दिवशी स्वागत केले आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयानंतर अनेक दिवसांची लोकांची ही मागणी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अध्यादेश काढून मान्य केली आहे हा लोकभावनेचा विजय आहे अशा शब्दात या निर्णयाचे स्वागत केले आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षाकडून महाविकास आघाडी सत्तेत असताना 29 जून 2022 रोजी संभाजीनगर आणि धाराशिव असा नामांतराचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात मान्य केला आहे जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येऊन या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळात मान्यता दिलेली असेल तर खासदार इम्तियाज जलील यांचे आज शनिवारी केलेले आंदोलन केवळ राजकीय असून राजकीय स्वार्थासाठी विशेषतः अल्पसंख्यांक लोकांना खुश करण्यासाठी केलेल्या आंदोलन असेच वर्णन करावे लागणार आहे
या प्रश्नाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने 3 फेब्रुवारी 2023 रोजी नरेंद्र मोदी सरकारने या निर्णयाला मान्यता दिली राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी 24 फेब्रुवारी 2023 रोजी तालुका जिल्हा आणि सर्व शासकीय कामात उपयोगात आणण्यासाठी चा अध्यादेश जारी करून या महत्त्वाच्या मागणीला जारी केले इतिहासामध्ये या मागणीच्या अनुषंगाने माहितीचा शोध घेतला असता सातवाहन राजा जेव्हा चौदाव्या शतकामध्ये राज्य करीत होता तेव्हा या परिसरात खाम नदी वाहत होती आणि या खांब नदीच्या अवतीभवती छोटी छोटी खेडे होती त्यामध्ये अनेक खेड्यापैकी खडकी नावाचे गाव होते आणि तेच पुढे औरंगाबाद झाले असा इतिहास सापडतो चौदाव्या शतकामध्ये देवगिरीचा राजा राजा कृष्णदेव यांच्या कार्यकाळात या शहराचे नाव खडकी होते असा अनेक दाखल्यांचा इतिहास पुढे आला आहे त्यानंतर 1604 मध्ये अहमदनगरचा निजामशहा मृत्यूच्या द्वितीय यांचा मंत्री मलिक अंबर यांनी या शहराचे नाव फतेह नगर केले त्याचा मुलगा फतेह खान याचा देखील या नामांतराशी संबंध सापडतो त्याने 1626 मध्ये या शहराला अधिकृत घोषित केले त्यानंतर 1636 मध्ये शहाजहान बादशहाने औरंगाबाद येथे पाठवले तेव्हा औरंगजेबाने या शहराचे नाव बदलून खुजिस्टी बुनियाद असे ठेवले हा इतिहास असून यानंतर याच औरंगजेबाने पुन्हा एकदा 1657 मध्ये खुजिस्टी दुनिया बदलून औरंगाबाद असे नामकरण केले त्यानंतर प्रदीर्घ काळ हेच नाव उपयोगात आणले गेले दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेस या पक्षाचे राज्य राहिले आणि त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात कोणतेही वातावरण निर्माण झालेले नव्हते परंतु 1988 मध्ये शिवसेनेचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा या शहराला संभाजीनगर असे संबोधले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक सभेमध्ये आणि सामना या वर्तमानपत्राच्या लिखाणा मधून सातत्याने संभाजीनगर असा उल्लेख केलेला आहे सर्व हिंदुत्ववादी संघटना तेव्हापासून या शहराला संभाजीनगर असे संबोधतात यामध्ये औरंगजेबाचा जुलमी राजवटीला जुगारणे एवढाच अर्थ आहे अन्याय आणि अत्याचारी प्रतीक पुसून छत्रपती संभाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा देणारे वातावरण निर्माण होण्यासाठी या शहराला छत्रपती संभाजी नगर असे नाव देण्यात आले आहे यादरम्यान
यादरम्यान 1995 मध्ये असलेल्या शिवसेना भारतीय जनता पार्टी युती सरकारच्या काळात या शहराच्या नामांतराचा विषय राज्य मंत्रिमंडळात मान्य करण्यात आला त्याला मान्यता देण्यात आली परंतु या काळात हा प्रश्न न्यायप्रविष्ठ झाला त्यानंतर आलेल्या काँग्रेस सरकारने 1999 मध्ये कोर्टामध्ये हा प्रस्ताव मागे घेतल्याची माहिती दिली त्यामुळे हा प्रश्न पुन्हा मागे पडला परंतु बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेकडून तसेच गोपीनाथ मुंडे आणि भारतीय जनता पार्टी कडून संभाजीनगर असाच नमूल्य होत राहिला दैनिक सामना मधून संभाजीनगर असेच संबोधण्यात येत होते. महाराष्ट्रामध्ये अनपेक्षित पणे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती फुटली उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये येऊ द्यायचे नाही या उद्देशाने शरद पवार आणि काँग्रेस बरोबर हात मिळवणी केली त्यामधून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून स्वतः उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली व अडीच वर्ष राज्य कारभार केला यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी पक्षांमध्ये 40 आमदार फोडून क्रांती केली आणि भारतीय जनता पार्टी सोबत सरकार करण्याची हालचाल सुरू केली तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गडबडीमध्ये शेवटच्या बैठकीमध्ये राज्यमंत्री मंडळात औरंगाबाद शहराचे संभाजीनगर व उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळात मंजूर करून घेतला अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात अजित पवार छगन भुजबळ उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासारख्या सर्व मंत्रिमंडळातील सदस्यांनी या निर्णयाला संमती दिली आणि उद्धव ठाकरे यांनी नामांतराचा निर्णय जाहीर करून टाकला मात्र त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारकडे जो पाठपुरावा करणे अपेक्षित होते तसा पाठपुरावा न झाल्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला नव्हता ही संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोडाही विलंब न करता दवडली आणि पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय घेऊन त्याला संमती दिली व अंतिम मान्यतेसाठी हा निर्णय मोदी सरकार म्हणजे केंद्र सरकारकडे पाठविला या निर्णयाला केंद्र सरकारकडून 3 फेब्रुवारी 2023 रोजी मंजुरी देण्यात आली त्यानंतर अध्यादेश काढण्याची प्रक्रिया पंधरा दिवसात पूर्ण झाली व 24 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा नामांतराचा निर्णय अध्यादेश काढून जाहीर केला त्यानंतर मराठवाड्यात सर्वत्र फटाके फुटले पेढे वाटले गेले आनंद साजरा केला गेला चौका चौकामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे फलक लावून लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले सर्वत्र दिवाळीप्रमाणे आनंद साजरा करण्यात आला 35 40 वर्षे रेंगाळत पडलेला प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अडीच तीन महिन्याच्या कार्यकाळात सोडवून दाखवला अशी प्रतिक्रिया उमटली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावामध्ये भगव्या गुलालाची उधळण करत व कुंकवाची उधळण करत जल्लोष केला सर्व सरकारी कार्यालयांमध्ये देखील या नावाचा उल्लेख करण्यासंदर्भात तयारी सुरू झाली आहे परंतु या निर्णयाच्या विरोधात खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी चार मार्च 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे विरोध करण्यासाठी निदर्शने केली आणि तेथे औरंगजेबाचा फोटो देखील प्रसिद्ध केला अत्यंत चितावणीखोर कृत्य खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून झालेले आहे या संदर्भात आगामी दोन-चार दिवसांमध्ये पडसाद उमटतील आणि वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या सरकारने घेतलेला नामांतराचा निर्णय विद्यमान भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट यांच्याकडून तोच निर्णय घेतलेला असेल तर या निर्णयाला अल्पसंख्याक समाजाने विरोध करता कामा नये कारण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ही अनेक वर्षाची सत्ताधारी मंडळी उद्धव ठाकरे यांनी नामांतराचा निर्णय घेतला तेव्हा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी देखील या निर्णयाला मान्यता दिलेली आहे त्यामुळे आपल्या समविचारी पक्षांनी देखील मान्यता दिलेली असताना खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा या प्रश्नावर राजकारण करणे निश्चित मराठवाड्यासाठी योग्य नाही एका बाजूला पश्चिम महाराष्ट्रामध्ये नीरा देवधर धरण पाणी प्रश्न तेथील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी चार हजार कोटी रुपये राज्य सरकारने देऊन बारामतीला चाललेले पाणी पुन्हा वळवून सोलापूर सांगली पुणे जिल्ह्यामध्ये आणण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण मात्र भावनेच्या राजकारणामध्ये न अडकता विकासाच्या राजकारणामध्ये विशेषता कृषी क्षेत्राला पाणी मिळाले पाहिजे मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी पाणी मिळाले पाहिजे अशा प्रकारच्या प्रश्नावर आपण संघर्ष केला पाहिजे जो निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्याला मान्य करून हा राज्य सरकारचा निर्णय हा 13 कोटी लोकांचा निर्णय समजून खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रश्नांमध्ये राजकारण करू नये अशी लोकभावना या निमित्ताने पुढे आली आह
यादरम्यान